social organisation statement given to the administrative officer
social organisation statement given to the administrative officersakal

Ulhasnagar News : बदलापूर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उल्हासनगरात दक्षता घ्यावी; सामाजिक संस्थेने प्रशासनाधिकारी यांना दिले निवेदन

बदलापूर मधील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर घृणास्पद अत्याचार झाल्याची चिढ आणणारी घटना घडली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे.
Published on

उल्हासनगर - बदलापूर मधील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर घृणास्पद अत्याचार झाल्याची चिढ आणणारी घटना घडली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उल्हासनगर मधील सर्व शासकीय व खाजगी शाळांनी दक्षता घ्यावी व सौचालयाजवळ महिला सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. अशा मागणीचे निवेदन एक हात मदतीचा सामाजिक संस्थेने महानगरपालिका प्रशासनाधिकारी यांना दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com