"तुम्ही OBC मध्ये का येत नाहीत", विजय वडेट्टीवार यांची संभाजी राजे छत्रपतींना ऑफर

सुमित बागुल
Saturday, 10 October 2020

विजय वड्डेट्टीवर यांनी मला OBC समाजात का समाविष्ट होत नाहीत अशी ऑफ द रेकॉर्ड विचारणा केली होती.

मुंबई : OBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वच OBC नेते आणि एकंदरीत सर्व समाजाचा विरोध आहे. स्वतः मराठा नेते संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मराठा आरक्षण हे 'अदर बॅकवॉर्ड क्लास' म्हणजेच OBC मधून नकोय अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे.

या पार्श्वभूमीवर आता एक नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि OBC नेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी राजे छत्रपती यांना मराठा समाजाने OBC मध्ये समाविष्ट व्हावं अशी थेट ऑफर दिली आहे.

महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा किंवा दांडियाची शक्यता धूसर, गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवासाठीही नियमावली

मुलाखतीत काय म्हणालेत संभाजीराजे छत्रपती ? 

"काल दोघे एकत्र होतो, ते माझ्या बाजूलाच बसलेले मुख्यमंत्र्यांच्याची मिटिंग असताना. आणि त्यांनी मला ऑफ द रेकॉर्ड एक गोष्ट बोलले. ती रेकॉर्डवर आणण्यास हरकत नाही. त्यांचं मोठं मन देखील असेल मराठा समाजाबद्दल. आमचा OBC चा मराठा आरक्षणाला विरोध नाही, उलट तुम्ही OBC मध्ये का येत नाहीत. जसे OBC मध्ये अ, ब, क, ड असे प्रवर्ग आहेत त्यात आणि एक प्रवर्ग वाढवू आणि वाढीव आरक्षण घ्या. मी जर खोटं बोलत असेन तर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण करावं. मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या रक्ताचा वंशज या नात्याने सांगतो, ही त्यांची वाक्य आहेत."

काल एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत खुलासा केलाय. विजय वड्डेट्टीवर यांनी मला OBC समाजात का समाविष्ट होत नाहीत अशी ऑफ द रेकॉर्ड विचारणा केली होती. संभाजी राजे छत्रपती यांच्या दाव्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया काय येतेय हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

vijay wadettiwar asked sambhajiraje chatrapati to come under other backward class   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay wadettiwar asked sambhajiraje chatrapati to come under other backward class