लढवय्या! कोविडसह अन्य आजारांवर मात करुन ८५ दिवसांनी हॉस्पिटलमधून आले घरी

विक्रोळीत राहणाऱ्या भारत पांचाळ यांच्या कुटुंबाला उपचारासाठी ४० लाखांच्या घरात खर्च आला.
Medical Treatment in covid situation
Medical Treatment in covid situation SYSTEM

मुंबई: कोरोना व्हायरस (corona virus) या आजाराचं स्वरुप प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. काही रुग्णांसाठी हा आजार प्राणघातक (life threatning) ठरतो, तर काही जणांना कोरोनाची लागण होऊनही त्यांच्यात लक्षणे (corona symptoms) दिसत नाहीत. कोरोनाची लक्षणे तीव्र स्वरुपाची असली, तर रुग्णालयात (hospital) दाखल व्हावं लागतं. कधी आठवडाभर, तर कधी महिन्याभरासाठी रुग्णाला रुग्णालयात थांबावं लागतं. (Vikhroli man goes home after 85 days in hospital for Covid)

मुंबईत विक्रोळी भागात राहणारी एक व्यक्ती तब्बल ८५ दिवसानंतर कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतली. ५४ वर्षीय भारत पांचाळ असे या रुग्णाचे नाव आहे. तब्बल तीन महिन्यानंतर सोमवारी त्यांना हिरानंदानी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. भारत पांचाळ घरी आल्यामुळे आता त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पण मधल्या काळात त्यांनी अनेकदा अपेक्षा सोडून दिली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

Medical Treatment in covid situation
दुबईवरुन परतलेल्या तरुणीची आत्महत्या, प्रियकर आणि त्याच्या पत्नी विरोधात तक्रार

आठ एप्रिलपासून भारत पांचाळ यांना ताप यायला सुरुवात झाली. कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी त्यांना हा त्रास सुरु झाला. ताप यायला लागल्यापासून चारच दिवसांनी त्यांच्या फुप्फुसांमध्ये गंभीर लक्षणे दिसली. आठवड्याभरात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सीटी स्कॅनवरुन त्यांना कोविडची गंभीर बाधा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर भारत पांचाळ यांच्या शरीरातील अन्य अवयवांवर परिणाम दिसू लागला. त्यांची प्रकृती खालावली.

Medical Treatment in covid situation
नारायण राणेसह 'या' नेत्यालाही केंद्रीय मंत्रिपद

भारत पाचांळ तब्बल ७० दिवस व्हेंटिलेटरवर होते. कोविड-१९ च्या रुग्णांच्या शरीरात ज्या समस्या निर्माण होतात, ते आजाराचे प्रत्येक लक्षण त्यांच्यामध्ये होते, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी रेमडेसिव्हीरपासून ते प्लाझ्मा थेरेपी आणि अन्य उपचार पद्धती अवलंबून पाहिल्या. कुटुंबाची सुद्धा अस्वस्थतता वाढत होती. पण अखेर डॉक्टरांच्या मेहनतीला यश आले. हळूहळू पांचाळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली व ८५ दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. पांचाळ कुटुंबाला उपचारासाठी ४० लाखांच्या घरात खर्च आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com