

कैलास म्हामले
कर्जत : कर्जत तालुक्यात गोवंश तस्करीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत अशा अनेक कटांना उधळून लावले आहे. अशाच एका घटनेत, महाशिवरात्रीच्या दिवशी कशेळे परिसरातील धोत्रे गावात गोवंश तस्करी करणारी गाडी स्थानिक नागरिकांनी पकडली. मात्र, पाठलागादरम्यान गाडीचा भीषण अपघात झाला आणि त्यात चार गोवंश मृत्युमुखी पडले.