
मुंबई : कोरोना व्हायरसचा विळखा मुंबई शहरात जास्त आहे. त्यासोबतच नवी मुंबईतही कोरोनाबाधितांचा रुग्णांचा आकडही सर्वाधिक आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 4 हजार अधिक कोविड-19 प्रकरणे नोंदली गेलीत. जवळपास 57% टक्के रिकव्हरी रेटसह ही आकडेवारी आहे. पण नवी मुंबईच्या जवळ असणाऱ्या उरण तालुक्यात यशाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. उरणकरांनी कोरोनावर मात करुन आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, उरणमध्ये रिकव्हरी रेट हा 99.2 टक्के झाला असून सध्या केवळ एकच रुग्ण उपचार घेत आहे.
करंजा गाव, 8 वाड्या असलेल्या गावाची लोकसंख्या जवळपास 10 हजारांच्या घरात आहे. या गावात तब्बल 134 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. उरण तालुक्यात करंजा गाव हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. आनंदाची गोष्ट म्हणजे, या गावातील 134 कोरोनाबाधित रुग्णांपैकी फक्त एकाच रुग्णावर उपचार सुरू आहे. इतर 133 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शिल्लक राहिलेल्या एका रुग्णाला पुढच्या चार दिवसांत घरी सोडण्याची शक्यता आहे.
महसूल अधिकारी, पोलिस आणि शिक्षक आणि डॉक्टर यांना या यशाचं श्रेय जातं. प्रशासनानं येथे लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित केली म्हणून हे गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करु शकलं.
24 एप्रिल रोजी, गावातील एक 59 वर्षीय महिला, सहा वर्षांपासून डायलिसिसचे उपचार घेत होती. तिचं राहत्या घरी निधन झाले. 4 मे रोजी तिचे पती (65) यांचे निधन झाले. या दोघांचे मृत्यू कोविड- 19 मुळे झाले की अन्य कारणामुळे याची माहिती मिळू शकली नाही. कारण दोघांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली नव्हती तसंच त्यांनी कोणत्याही लक्षणांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतला नव्हता. या कुटुंबाचा मासेमारीचा व्यवसाय आहे आणि कुटुंबातील सदस्य नेहमीप्रमाणे बाजारात मासे विक्रीसाठी गेले. याव्यतिरिक्त, मृत महिला डायलिसिससाठी नियमितपणे रूग्णालयात जात होती, असं पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांनी सांगितले.
8 मे रोजी मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी 100 हून जास्त गावकरी उपस्थित होते. त्याच दरम्यान मृतांच्या कुटूंबाकडून गावात कोविड-19चा पहिला रुग्ण आढळून आला. संपर्क ट्रेसिंगद्वारे, अधिका्यांनी कुटुंबातील 22 कोरोना पॉझिटिव्हची प्रकरणं शोधून काढली.
सर्व 22 लोक एका दुमजली इमारतीत थांबले होते. 65 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर आम्ही संपूर्ण कुटुंबाची चाचणी करण्यास सुरुवात केली, असं उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे म्हणाले. 13 मे पर्यंत गावात कोरोनाबाधितांचा आकडा हा 95वर पोहोचला होता. त्यानंतर हा आकडा 134 वर पोहोचला. सर्वात मोठे आव्हान होतं ते म्हणजे लोकांची चाचणी करणं आणि त्यांना क्वांरटाईन ठेवणं. बऱ्याच घटनांमध्ये लोकांना चाचणी करण्यासाठी पोलिसांना जबरदस्ती करावी लागली, असं अंधारेंनी यांनी सांगितलं.
यानंतर प्रशासनानं शिक्षक आणि डॉक्टरांसह सुमारे 200 लोकांना 25 टीममध्ये विभागले गेले. लक्षणं असलेले गावकऱ्यांना शोधण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी केली. महसूल विभागातील सुमारे 40 लोकं, यांच्यासह एक तहसीलदार, सहा नायब तहसीलदार, लिपिक, तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी उरण तालुका कार्यालयात स्थापित कोविड-19 कंट्रोल रूममधील पथकासोबत समन्वय साधला.
लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याचे पथकांनी सुनिश्चित केले. येथे लोकांना अत्यावश्यक वस्तूंसाठी सुद्धा बाहेर पडण्याची परवानगी नव्हती, जे त्यांना त्यांच्या घरपोच पुरवले जात होते. मेडिकल स्टोअरला पुन्हा उघडण्याची परवानगी होती. त्यानंतर हळूहळू बँका, एटीएम आणि 33 किराणा दुकानांना पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.
लॉकडाऊन दरम्यान लोक घराबाहेर पडतात का हे पाहण्यासाठी आम्ही ड्रोनचा वापर केला. तसंच जी दुकानं खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्या दुकांनाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही लक्षणं नसल्याचं सांगून काही लोकांनी चाचणी करण्यास नकार दिला मात्र तिचं लोकं नंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळली, असं उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.
134 प्रकरणांमध्ये चार महिन्यांचं बाळ आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेला एका 82 वर्षीय व्यक्तीचाही समावेश होता. तसंच 14 अल्पवयीन मुलांनाही कोरोनाची लागण झाली होती. अगदी अल्पवयीन असूनही मृत्यूची नोंद झाली नाही. ही आमची सर्वात मोठी कामगिरी असल्याचं नवले म्हणालेत.
1.66 लाख लोकसंख्या असलेल्या उरण तालुक्यात आतापर्यंत 197 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी 134 करंजा या गावातील आहेत. 197 पैकी सद्यपरिस्थिती 30 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.