डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा साई चौक परिसरात भाजी विक्री (Vegetable Seller) करणाऱ्या एका महिलेला मद्यपान करून आलेल्या एका व्यक्तीने "तू बांगलादेशी आहेस, पुरावे दाखव नाहीतर तुला इकडून हाकलून देईल," असे म्हणत भररस्त्यात शिवीगाळ केली. घाबरलेल्या महिलेने त्वरित खडकपाडा पोलिसांना (Khadakpada Police) संपर्क केला, मात्र वेळेत पोलीस न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनीच सदर व्यक्तीला चोप दिला.