Vidhan Sabha 2019 : विनायक मेटे अस्वस्थ; उमेदवारीकडे लागले डोळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

विनायक मेटे बीड मतदार संघातून निवडणूक लढवण्यास आग्रही होते, पण ही जागा सेनेच्या गोटात गेल्याने, मेटेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली.

मुंबई : महायुतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उमेदवारीचा चेंडू सध्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. विनायक मेटे बीड मतदार संघातून निवडणूक लढवण्यास आग्रही होते, पण ही जागा सेनेच्या गोटात गेल्याने, मेटेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली.

"मी बिडमधून निवडणूक लढवावी अशी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील' असे म्हणत मेटेंनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच आपण निवडणूक लढवण्यास कोणत्याही परिस्थितीत इच्छुक असल्याची प्रतिक्रिया मेंटेनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinayak Mete wants ticket for assembly elections from mahayuti