फटाकेबंदी असूनही मुंबईत आवाजाच्या पातळीचे उल्लंघन; आवाज फाउंडेशनचा अहवाल

भाग्यश्री भुवड
Sunday, 15 November 2020

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत आवाजाच्या पातळीचे उल्लंघन झाल्याची नोंद आवाज फाउंडेशन करण्यात आली असुन यंदा फटाक्यांच्या वापरात लक्षणीय घट झाल्याचे ही सांगण्यात आले आहे.

मुंबई - 15: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत आवाजाच्या पातळीचे उल्लंघन झाल्याची नोंद आवाज फाउंडेशन करण्यात आली असुन यंदा फटाक्यांच्या वापरात लक्षणीय घट झाल्याचे ही सांगण्यात आले आहे. आवाज फाउंडेशनने 14 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत आणि दुसर्या दिवशी पहाटेपर्यंत फटाक्यांच्य वापरातून झालेल्या ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजली. यावर्षी सर्वाधिक आवाजाची पातळी 105.5 डीबी नोंदवण्यात आली असुन शांतता क्षेत्राजवळील शिवाजी पार्क मैदानावर रात्री 10 वाजतादरम्यान ही नोंद करण्यात आली. 2010 नंतर पहिल्यांदाच शिवाजी पार्कला मुंबई हायकोर्टाने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले तिथे दिवाळीत फटाक्यांचा वापर करण्यात आला. 2019 मध्ये नोंदवलेली कमाल पातळी 112.3 डेसिबल ( डीबी ) होती; 2018 मध्ये 114.1 डीबी होती आणि 2017 मध्ये 117.8 डीबी होते.

हेही वाचा -  नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू करा, माथेरान नगराध्यक्षांची मागणी

दरम्यान, शिवाजी पार्क येथे गर्दी ची ही नोंद करण्यात आली. आणि बर्‍याच लोकांनी मास्कही घातला नव्हता. सरकारने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी केली असूनही लोकांकडून या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे समोर आले आहे. 

मुंबईच्या संपूर्ण शहरात आवाजाची पातळी मोजणे कठीण होते. कारण, मुंबईच्या काही भागात मोठमोठे फटाके फोडले गेले आहेत. ज्याचा काही भागांवर परिणाम ही झाला आहे. मला बोरिवली, वरळी, दहिसर, ठाणे आणि जुहू / वर्सोवा येथील नागरिकांकडून तक्रारी आल्या. शहरातील कित्येक भागांमध्ये रात्री 10 च्या अंतिम मुदतीनंतर अवैध फटाके आणि ‘ग्रीन क्रॅकर्स’ वापरुन उल्लंघन करूनही मागील वर्षांच्या तुलनेत फटाक्यांचा वापर लक्षणीय प्रमाणात कमी होता. 

हेही वाचा - एक्स्प्रेस वे फुल! खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

दिवाळीच्या सर्व दिवसांपेक्षा मागील वर्षांच्या तुलनेत फटाक्यांचा वापर बर्‍यापैकी कमी होता आणि काही फटाके ज्यामध्ये प्रामुख्याने स्पार्कलर्स, चक्री आणि अनार यांचा समावेश होता, ज्यामध्ये हवाई फटाके आणि रस्सी बॉम्ब यांचा समावेश होता.

आवाज फाऊंडेशनच्या वतीने जगातील आवाज करणार्या आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे अशक्य आव्हान स्वीकारल्याबद्दल मुंबईकर, मुंबई पोलिस व महाराष्ट्र सरकारचे आभार मानले गेले आहेत. सर्वांच्या सक्रिय सहभागाने मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्यात आला आहे. गणपती, ईद ई मिलाद आणि दिवाळीसह इतर ही सणांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडुन आवाज केला जातो. मात्र, हे प्रमाण यंदा फारच कमी झाले आहे. सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्व उत्सव पर्यावरणास अनुकूल पद्धतीने साजरे केले जातील अशी आशा आहे असे आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा - मधुमेह, स्वादुपिंड, लठ्ठपणा, उच्च रक्तदाबामुळे मुंबईत कोविड 19 चे अधिक बळी

मुंबईत मध्यम दर्जाची हवा- 

दिवाळीदरम्यान मुंबईच्या हवेवरही परिणाम झाला असुन अनेक भागांमध्ये मध्यम दर्जाच्या हवेची नोंद करण्यात आली आहे. शिवाय, मुंबई संपुर्ण शहराची हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली असून हवेची गुणवत्ता 115 एक्युआय नोंदवण्यात आला आहे. दिवाळीदरम्यान मुंबईच्या वातावरणात बरेच जाणवू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत थंडी पडल्याचा अनुभव घेण्यात आला. मात्र, आता हवेतील आर्द्रता वाढली असून उन्हाचे चटके बसत आहेत. भांडुप, कुलाबा, मालाड, वरळी, बोरीवली, बीकेसी, अंधेरी या परिसरातील हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे. यातील अनेक ठिकाणांचा एक्युआय 100 च्या वर नोंदवण्यात आला आहे. 

चेंबूरची हवा वाईट - 

दरम्यान, चेंबूर ची हवा वाईट दर्जाची नोंदली गेली असुन 256 एक्युआय एवढी हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे. तर, माझगाव आणि नवी मुंबई या दोन ठिकाणची हवा सफर संस्थेने समाधानकारक नोंदवली आहे.

Violation of noise level in Mumbai despite fireworks ban Report by the Voice Foundation 

-----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of noise level in Mumbai despite fireworks ban Report by the Voice Foundation