VIP Culture : उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या सुरक्षेवर मोहित कंबोज यांचा आक्षेप; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Convoy
VIP Culture : उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या सुरक्षेवर मोहित कंबोज यांचा आक्षेप; म्हणाले...

VIP Culture : उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या सुरक्षेवर मोहित कंबोज यांचा आक्षेप; म्हणाले...

राज्यात सध्या VIP कल्चरवरुन चांगलेच वाद विवाद रंगत आहेत. सरकार बदलताच आधीच्या सरकारमधल्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यानेही वाद होत आहेत. नुकतंच अमृता फडणवीस यांनीही सुरक्षा नाकारल्याची चर्चा आहे. यातच आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उडी घेत उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

मोहित कंबोज यांनी ट्वीट करत याविषयी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षा ताफ्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज म्हणतात, "माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासाठी मुंबईतले रस्ते ३० मिनिटांसाठी रोखून धरले जातात. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेंना वाय प्लस सुरक्षा आहे. कोणतंही वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनेल यावर बोललेलं नाही."

गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. तर काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे. तर शिंदे गटातल्या आणखी काही नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. कालच अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत ट्रॅफिक क्लिअरन्स व्हॅन देण्यात आली होती, मात्र ती अमृता यांनी नाकारली आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेवर आक्षेप घेतल्याने मोहित कंबोज चर्चेत आले आहेत.