
डोंबिवली : दोन दिवसांपूर्वी डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारचालकांकडे एक इसम पैसे मागत असल्याच्या तसेच पोलिसांच्या नावाने अश्लील शिवीगाळ करत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. कल्याण शीळ रोडवरील बार चालकांनी हा इसम आमच्याकडे पैसे मागत असल्याचा आरोप करत संबंधित इसमावर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांकडे तक्रारीचे निवेदन दिले होते. या व्हिडीओ मधील इसम भगवान भुजंग यांनी समोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझे उसने घेतलेले पैसे बुडवण्यासाठी, एडिट केलेले व्हिडीओ व्हायरल करत मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारचालक बेकायदेशीरपणे बार चालवतायत मी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत असे भुजंग यांनी सांगितले.