Video: धावती ट्रेन पकडण्यासाठी तरूणाने मारली उडी अन्...

तुम्ही पाहिलात का अंगावर काटा आणणार व्हिडीओ?
Railway-Accident-Police
Railway-Accident-Police
  • तुम्ही पाहिलात का अंगावर काटा आणणार व्हिडीओ?

मुंबई: राज्यभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रभाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील विविध जिल्हे अनलॉक (Unlock) होत आहेत. मुंबई तिसऱ्या टप्प्यात असल्याने बससेवा सुरू आहे पण मुंबईची शान असलेली लोकल ट्रेन (Mumbai local) अद्याप सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. मुंबई लोकलमधून सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात रेल्वे रूळ किंवा स्टेशन परिसरातील अपघातांचे (Accidents) प्रमाण सुदैवाने कमी झाले आहे. अशातच कुर्ला स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या (Railway Police) प्रसंगावधानाने आणि चपळाईमुळे (Quick Reflex) एका तरूणाचा जीव वाचला. (Viral Video Man Catching Running Train about to fall between track and platform Railway Police saves Life)

Railway-Accident-Police
Lockdown Effect: मुंबईतील 5-स्टार 'हयात रिजन्सी' हॉटेल बंद

मुंबईतील लोकल सेवांना जशी कमी गर्दी आहे तशीच लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीही फारशी गर्दी नसल्याचे चित्र आहे. याच दरम्यान सोमवारी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजेच LTT स्थानकावर अंगावर काटा आणणार प्रकार घडला. एक मध्यमवयीन तरूण ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आला पण नेमकी त्याच वेळी ट्रेन सुटली आणि पुढे निघाली. ट्रेन सुटणार हे पाहून त्याने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा पाय सरकला आणि तो ट्रेन व प्लॅटफॉर्म यांच्या मधल्या जागेत अडकणार असल्याचं दिसलं. त्यावेळी तिथे असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत अतिशय चपळाईने त्या तरूणाला आधार दिला आणि सुरक्षित बाजूला केले.

पाहा व्हिडीओ-

Railway-Accident-Police
मुंबईकरांसाठी चांगली बातमी! रुग्णदुपटीचा कालावधी ५५० दिवसांवर

मध्य रेल्वेच्या प्रसिद्धीविभागाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, LTT रेल्वे स्टेशनवरून गोरखपूरला जाणाऱ्या रेल्वेत एक तरूण धावत ट्रेन पकडत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि त्याचा अपघात होणार इतक्यात RPF आरक्षक मिलिंद पठारे यांनी त्या माणसाला वाचवले. या व्हिडीओसोबतच, "कृपया प्रवाशांनी धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करू नये', अशी विनंतीही रेल्वे प्रशासनाने केली आहे.

Railway-Accident-Police
बससाठी चाकरमान्यांच्या रांगा; लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com