दम लगा के हैशाsss ... वाळकेश्वरचा थरारक Video पाहिलात का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दम लगा के हैशाsss ... वाळकेश्वरचा थरारक Video पाहिलात का?

दम लगा के हैशाsss ... वाळकेश्वरचा थरारक Video पाहिलात का?

मुंबईतला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय

मुंबई: जगातील महत्वाच्या शहरांपैकी एक म्हणजे मुंबई. देशाचं आर्थिक चक्र याच मुंबईतून फिरलं जातं. गजबजलेल्या मुंबईत माणसांची वर्दळ लक्षणीय असते. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस कसा होतो हे कित्येकांना कळतही नाही. सतत कामात व्यस्त असलेले मुंबईकर मनोरंजनासाठी फारच थोडा वेळ काढतात. पण माणुसकी आणि मदतीच्या बाबतीत मात्र मुंबईकर सर्वात पुढे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाल्याचं दिसतंय. (Viral Video Mumbaikars put overturned car back on its wheels social media reacts with applauds)

हेही वाचा: भन्नाट योगायोग! एका चहामुळे पोलिसांना सापडली बेपत्ता मुलगी

काय झालं नेमकं?

मुंबईच्या वाळकेश्वर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर एक कार उलटली होती. मुंबईकरांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उलटलेल्या कारला पुन्हा चाकांवर उभं करण्यासाठी मुंबईकरांनी कंबर कसली. अनेक माणसांनी एकत्र येत या कारला सुस्थितीत उभी करण्यासाठी एकीचे बळ दाखवलं. मुंबईकरांनी केलेल्या त्यांच्या समाजसेवेला सर्वच स्तरातून कौतुकाची थाप मिळाली.

पाहा तो व्हिडीओ-

हेही वाचा: तुम्ही जर दादागिरी करणार असाल, तर आम्ही... - प्रवीण दरेकर

नेटकऱ्यांनी मुंबईकरांच्या या कृतीची भरभरून प्रशंसा केली. विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अनेकांनी शेअर केला. फोटोग्राफर मानव मंगलानी याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओला सोशल मिडीयावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर तब्बल 3 लाख तर यू ट्यूबवर 12 लाख हिट्स मिळाले.

loading image
go to top