esakal | Virar Hospital Fire: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

बोलून बातमी शोधा

Virar Covid Hospital fire
Virar Hospital Fire: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. रुग्णालयातील १७ रुग्ण या आगीत अडकले असून अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आता रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याची सुरुवात केली आहे. या आग दुर्घटनेवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील घटनेची चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विरार रुग्णालयातील घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याचं म्हणत सरकारकडून योग्य ती मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढे राजेश टोपे म्हणाले की, आयसीयूत १७ जणांवर उपचार सुरु होते. रुग्णालयातील आगीत १३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये पाच महिला तर ८ पुरुषांचा समावेश आहे. दरवाजाजवळच्या चार रुग्णांना वाचवण्यात यश आलं असून एसीचा स्फोट झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटात आयसीयूमध्ये धूर झाला.

हेही वाचा: Virar Hospital Fire: १३ मृतांची नावे आली समोर

फायर ऑडिटचे काय?

फायर ऑडिट ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. आपण फायर ऑडिटचं काम बांधकाम विभाग करतं. तो आरोग्य विभागाच्या अखत्यारित येत नाही. फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम त्यांच्याकडून होतं. आता याची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांनाही फायर ऑडिटबाबतचे आदेश देण्यात येतील असंही राजेश टोपे म्हणाले.

आगीत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे

उमा सुरेश कनगुटकर- वय ६३ वर्षे

निलेश भोईर- वय ३५ वर्षे

पुखराज वल्लभदास वैष्णव- वय ६८ वर्षे

रजनी आर कडू- वय ६० वर्षे

नरेंद्र शंकर शिंदे- वय ५८ वर्षे

कुमार किशोर दोशी- वय ४५ वर्षे

जनार्दन मोरेश्वर म्हात्रे- वय ६३ वर्षे

रमेश टी उपायान- वय ५५ वर्षे

प्रवीण शिवलाल गौडा- वय ६५ वर्षे

अमेय राजेश राऊत- वय २३ वर्षे

शमा अरुण म्हात्रे- वय ४८ वर्षे

सुवर्णा एस पितळे- वय ६४ वर्षे

सुप्रिया देशमुख- वय ४३ वर्षे