

Virar forest department busts illegal khair wood smuggling hidden beneath vegetable transport in tempo
Sakal
विरार : भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा आडोसा घेऊन खैर लाकडाची बेकायदेशीर तस्करी करण्याचा प्रकार विरार पूर्वेतील मेढे परिसरात उघडकीस आला आहे. भाताणे वनक्षेत्रातील वन विभागाच्या पथकाने सोमवारी पहाटे धाडसी कारवाई करत टेम्पोसह मोठा मुद्देमाल जप्त केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत चालक घटनास्थळावरून पसार झाला.