

Infrastructure Boost: Narangi Railway Over Bridge Opened for Public in Virar
Sakal
विरार : विरार पश्चिमेतील नारिंगी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा नारिंगी रेल्वे ओव्हर ब्रिज अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल झाला असून वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचे लोकार्पण उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी, रेल्वे फाटकावरील प्रतीक्षा आणि सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांना या पुलामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.