esakal | विरार हॉस्पिटल अग्नितांडव नॅशनल न्यूज नाही - राजेश टोपे

बोलून बातमी शोधा

Rajesh-Tope
विरार हॉस्पिटल अग्नितांडव नॅशनल न्यूज नाही - राजेश टोपे
sakal_logo
By
दीनानाथ परब

वसई: विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. या भीषण अग्नि दुर्घटनेत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे कोविड रुग्णालय असून ICU मध्ये एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर सुदैवाने चार रुग्ण बाहेर पडल्यामुळे बचावले. एकूण ७० रुग्णांवर या रुग्णालयात उपचार सुरु होते. दोनच दिवसांपूर्वी नाशिक रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमधील गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज विरारमध्ये ही घटना घडली आहे.

या अग्नि दुर्घटनेनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही नॅशनल न्यूज नसल्याचे सांगितले. "राज्य सरकार आणि महापालिकेकडून प्रत्येकी पाच लाखांची अशी १० लाखांची मदत जाहीर करु, असे त्यांनी सांगितले. नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेच्या धर्तीवरच रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणार आहोत" असे त्यांनी जाहीर केले.

हेही वाचा: मुंबईत कोरोनामुळे एकाचदिवशी ७५ रुग्णांचा मृत्यू

"रुग्णालयाचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यकच आहे. जर ते करण्यात कुचराई झाली असेल, तर सक्तीने कारवाई करु. १० दिवसात या घटनेचा चौकशी अहवाल सादर होईल. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करु, या दुर्देवी घटनेत ज्या रुग्णांनी प्राण गमावलाय, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत" असे राजेश टोपे म्हणाले.