उल्हासनगर : मासे विक्रेता निघाला मोटरसायकल चोर; पोलिसांनी आवळल्या मुसक्या | Ulhasnagar crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief arrested

उल्हासनगर : मासे विक्रेता निघाला मोटरसायकल चोर; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

उल्हासनगर : मोटरसायकलवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकाला विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vitthalwadi police) ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मासे विक्रेता (Fish seller) असणाऱ्या हा तरुण रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर (bike thief) निघाला असून त्याच्याकडून 5 मोटरसायकली हस्तगत (five bikes recovered) करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: ‘सकाळ सन्मान सोहळा’; माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मान!

उपनिरीक्षक हर्षल राजपूत,पोलीस हवालदार रामदास मिसाळ,पोलीस नाईक जितेंद्र चित्ते,पांडुरंग पथवे, कॉन्स्टेबल गणेश राठोड, वैजिनाथ राख,गणेश डमाळे, हरेश चव्हाण ही टीम कानसाई रोड भरत नगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना मलंग शेख हा तरुण मोटरसायकलवर संशयास्पदरित्या फिरताना दिसला. त्याला मोटरसायकल बाबत विचारणा करण्यात आल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये अभिलेख पडताळला. तेंव्हा ही मोटरसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मलंगने मध्यवर्ती,अंबरनाथ, विठ्ठलवाडी आणि जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. त्याने या गाड्या अंबरनाथ मध्ये लपून ठेवल्या होत्या. त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मलंग शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने त्याला 23 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस नाईक रोहिदास बुधवंत करत आहेत. आरोपी मलंग शेख हा अंबरनाथ मधील भास्कर नगर, बुवापाडा येथे राहणारा असून तो मासे विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Vitthalwadi Police Arrested Bike Thief Who Used To Sell Fish Ulhasnagar Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :robberycrime update
go to top