old man surgery
sakal
विरार - आवाज हा फक्त बोलण्याचा मार्ग नाही, तर तो आपल्या भावना, ओळख आणि नात्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असतो. आवाज हरवला की माणूस फक्त बोलणं नाही, तर स्वतःला व्यक्त करणंही हरवून बसतो. कधी कधी आयुष्य अशी शांतता देतं की आपण तीच आपली नियती मानून जगू लागतो. पण आधुनिक वैद्यकशास्त्र त्या शांततेलाही पुन्हा आवाज देऊ शकतं.असाच एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अनुभव मुंबईत समोर आला आहे, जिथे ७३ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा आपला आवाज मिळवला.