जेएनपीटीत स्वेच्छानिवृत्ती! दीड हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्‍यात? 

जेएनपीटीत स्वेच्छानिवृत्ती! दीड हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्‍यात? 

उरण : केंद्र सरकारने देशातील 11 सरकारी प्रमुख बंदरांतील सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे. त्यामध्ये जेएनपीटीतील 1 हजार 473 कामगारांचाही समावेश आहे. या योजनेबाबत कामगारांमध्ये असंतोष आहे. 

बंदर आणि नौकानयन विभागाचे सचिव राजीव नयन यांनी 12 नोव्हेंबरला देशातील सरकारी 11 बंदरांसाठी पत्र जारी केले आहे. त्यानुसार विशेष स्वेच्छा निवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या कामगारांच्या वारसांना नोकरी देणे बंदरांना बंधनकारक राहणार नाही. तसेच या योजनेचा कालावधीसाठी 6 महिन्यांची मुदत आहे. त्यामुळे ती स्वीकारणाऱ्या कामगारांनी 3 महिने आधी नोटीस देणे बंधनकारक केले आहे. 

दरम्यान, या योजनेमुळे 30 वर्षांहून कमी काम केलेल्या कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्ती आर्थिकदृष्ट्या तोट्याची ठरणार असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.  या बाबतीत जेएनपीटी बंदर प्रशासनाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

देशातील प्रमुख 11 बंदरांत कार्यरत कर्मचारी 
कोलकाता
3 हजार 772 
पॅरादीप 758 
विशाखापट्टणम 3,150 
चेन्नई- 3,953 
व्ही.ओ. चिदंबरन 691 
कोचीन 1,394 
न्यू मंगलोर 6021, 513 
मुंबई- 6,430 
जेएनपीटी- 1,473 
दीनदयाळ- 2, 203 

Voluntary retirement in JNPT Jobs of one and a half thousand workers at risk 

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com