आदित्य ठाकरेंच्या 'वरळी' मतदार संघात मतदानाचा टक्का घसरला 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 October 2019

वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.या मतदारसंघात 1,49,067 पुरुष तर 1,16,024 महिला असे एकूण 2,65,091 इतके मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईतील सर्वाधिक ऑफलाईन नोंदणी होणारा मतदारसंघ वरळी हाच होता. 2014 रोजी झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील शिंदे निवडून आले होते.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीमुळे राज्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे. 2014 रोजी या मतदारसंघात 55.75 टक्के लोकांनी मतदान केलं होतं तर यावेळी ही टक्केवारी 50.20 वर आली असल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत 5.55 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. 

'ठाकरे' घराण्यातील पहिला ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याचे कळाल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत आहे. आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेने या मतदारसंघात चांगला जोर लावला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनाच पक्षात घेत शिवसेनेने आपले विरोधक संपवले होते.यामुळे या मतदारसंघात भरघोस मतदान होईल अशी अपेक्षा शिवसेनेला होती. 

2009 चा अपवाद वगळता वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.या मतदारसंघात 1,49,067 पुरुष तर 1,16,024 महिला असे एकूण 2,65,091 इतके मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईतील सर्वाधिक ऑफलाईन नोंदणी होणारा मतदारसंघ वरळी हाच होता. 2014 रोजी झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील शिंदे निवडून आले होते. यामुळे शिवसेनेचा हा गड अधिक भक्कम झाला होता.यावेळी शिवसेना-भाजपची युती झाली, मनसेने आपला उमेदवार दिला नाही तर विरोधकांनी ही या मतदारसंघात थोडी 'ढिल' दिल्याने आदित्य ठाकरेंसमोर आव्हान उभे राहीलेच नाही.यामुळे शिवसेनेच्या बाजूने एकतर्फी मतदान होईल अशी रणनीती शिवसेनेने यावेळी आखली होती.मात्र मागच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरल्याने शिवसेनेचा अपेक्षा भंग झाला आहे. 

Webtitle : voting percentage in worli constituency dropped


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: voting percentage in worli constituency dropped