वाडिया हॉस्पिटल बंद करण्याचा घाट कुणाचा?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

परळमधील वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद करण्याचा घाट संस्थेकडून घातला जात आहे. वाडिया व पालिका यांच्या वादात मागील तीन महिन्यांचे ९८ कोटींचे अनुदान मिळत नसल्याने रुग्णालयाला घरघर लागली आहे.

मुंबई - परळमधील वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद करण्याचा घाट संस्थेकडून घातला जात आहे. वाडिया व पालिका यांच्या वादात मागील तीन महिन्यांचे ९८ कोटींचे अनुदान मिळत नसल्याने रुग्णालयाला घरघर लागली आहे. तसेच आरोग्य सेवेवरही ताण येत आहे, असा आरोप नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीत केला. महापालिकेने तीन महिन्यांचा प्रलंबित निधी तत्काळ ट्रस्टला द्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी या वेळी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लहान मुलांवरील उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या वाडिया रुग्णालयाची ४० टक्के जागा पालिकेची असून रुग्णालय चालवण्यासाठी पालिकेकडून अनुदान दिले जाते; मात्र जागा व निधी पालिकेकडून दिला जात असतानाही रुग्णालय खासगी पद्धतीनेच चालवले जाते. निधी देऊनही रुग्णांना अपेक्षित सेवा मिळत  नाहीत. त्यामुळे हे रुग्णालय नियंत्रण पालिकेकडे द्यावे, असे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका व वाडिया यांच्या वादात पालिकेकडून दिले जाणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळालेले नाही. निधीअभावी रुग्णालयाच्या सेवा - सुविधांवर ताण येत असल्याने यापुढे रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही. शिवाय जे रुग्ण दाखल आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्याची भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. 

हेही वाचा : मुंबईत रेल्वे अपघाताचे दहा वर्षांत २७ हजार बळी

स्थायी समितीत मुद्दा उपस्थित
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आज स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. पालिका-वाडिया रुग्णालयाच्या वादात लहान मुलांचे रुग्णालय निधीअभावी बंद करण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला.

हेही वाचा : मुंबईकर रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाबाबत नाराज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wadia hospital closure due to lack of grant