कोरोना रुग्ण वाढतायत ! ठाण्यातील 'हा' भाग 24 मे पर्यंत पूर्णतः बंद, फक्त मेडिकल स्टोअर्स राहणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समितीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समितीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वारंवार सूचना देवूनही नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वागळे परिसर 24 मे पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे पालिका हद्दीतील वागळे प्रभाग समिती क्षेत्रात कोविड-19 रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 मे पासून हा परिसर लॉकडाऊन करुनही नागरिक रस्त्यावर, दुकानांवर, भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे वर्दळ वाढली आहे. 

Big News - क्या बात हैं ! प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी, नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

नागरिकांमार्फत सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसून लॉकडाऊन करुनही काही सुधारणा दिसून आलेली नाही. वागळे प्रभाग समिती परिसरातील कोरोना रुग्णांची दिवसेदिवस वाढत चाललेली संख्या विचारात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून 24 मे पर्यंत लाॅकडाऊन आणखी कठोर करण्यात आले आहे.

सदर परिसरात कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग कमी करण्यासाठी परिसर नागरिकांच्या वावरासाठी संपूर्णत : बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या परिसरातील फक्त औषधांची दुकाने सुरू राहणार आहेत. 

wagale estate area will remain total sealed till 24th may read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wagale estate area will remain total sealed till 24th may read full story