Water Issue : पाणीबाणीच्या शापातून सुटकेची प्रतीक्षा; रात्री-बेरात्रीचे वेळापत्रक, महिलांवर पाण्यासाठी नाईट शिफ्टची वेळ

गेल्या 8 वर्षांपासून पिण्याचे पाणी सोडण्याची रात्री-बेरात्रीचे वेळापत्रक. महिलांवर पाण्यासाठी नाईटशिफ्ट करण्याची वेळ.
Ulhasnagar Social Workers
Ulhasnagar Social Workerssakal
Updated on

उल्हासनगर - गेल्या 8 वर्षांपासून पिण्याचे पाणी सोडण्याची रात्री-बेरात्रीचे वेळापत्रक. महिलांवर पाण्यासाठी नाईटशिफ्ट करण्याची वेळ. ही पाणीबाणीच्या शापाची वस्तुस्थिती आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुभाष टेकडी परिसराची असून हा परिसर शापातून सुटका कधी होणार याची प्रतीक्षा करू लागला आहे. या संदर्भात समाजसेवकांनी आक्रोश व्यक्त केला आहे.

दहाचाळ, भिमशक्ती, डिफेंन्स,अशोक वन, बुध्द कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, सर्टिफाय स्कुल, सुभाष टेकडी, साईबाबा, आम्रपाली, पंचशील, सिध्दार्थ हौसीग सोसायटी, गुरूव्दारा असे हे परिसर आहेत. विशेष म्हणजे कधी रात्री तर कधी अकरा किंवा आणखीन उशिराने पाणी पुरवठा सुरू होणार अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे, प्रशांत चंदनशिवे आदी मास मीडियावर फॉरवर्ड करतात.

याच माहितीच्या आधारे महिला घरचा स्वयंपाक आटोपून पाण्यासाठी नाईटशिफ्ट करण्यासाठी सज्ज राहतात.या परिसराला हा शाप 2017 पासून लागलेला आहे. पाणी वेळेवर आणि एकाच वेळी सोडण्यात यावे यासाठी अनेकदा विविध प्रकारची आंदोलने झाली आहेत. मात्र अधिकारी आश्वासन देऊन बोळवण करून विशेषतः महिलांना वेठीस धरतात असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी केला आहे.

आम्हा महिलांवर दिवसभर घरातील कामे आणि रात्री पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी जागता पहारा करण्याची वेळ येते. उल्हासनगर महानगरपालिकेला पहिल्यांदा आयएएस अधिकारी असणाऱ्या मनीषा आव्हाळे ह्या महिला आयुक्त लाभल्या आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान असून त्यांनी आमची या शापातून सुटका करावी अशी मागणी समाजसेविका शुभांगी चव्हाण यांनी केली आहे.

'स्वराज्य संघटना उडी घेणार'

पाणी हे जीवन असताना पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी खेळखंडोबा केल्याने ही शापित अवस्था सुभाष टेकडी परिसराची झाली आहे. आता या प्रकरणात स्वराज्य संघटना उडी घेणार असून हा प्रश्न तडीस नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट जय गायकवाड यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com