वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संतसाहित्य संमेलन मुंबईत! दोन दिवस चालणार संमेलन

वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संतसाहित्य संमेलन मुंबईत! दोन दिवस चालणार संमेलन

मुंबई  ः वारकरी साहित्य परिषदेचे नववे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सोमवारी व मंगळवारी मुंबईत होईल. यात अभंगवाणी, कीर्तन याचबरोबर संप्रदायाच्या परंपरेची जोपासना, प्रदूषण या विषयांवर चर्चासत्र होईल. 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते सोमवारी संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दिंडीसोहळा होईल. ह.भ.प. अमृतमहाराज जोशी यांच्याकडून ह.भ.प. चकोरमहाराज बावीस्कर हे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. दुपारी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर तर दुसऱ्या सत्रात प्रदूषण या विषयावर माणिक गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्रे होतील. संध्याकाळी सामुदायिक हरिपाठ झाल्यावर ह.भ.प. भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर यांची अभंगवाणी व त्यानंतर भागवतमहाराज शिरवळकर यांचे कीर्तन होईल. 

मंगळवारी सकाळी काल्याचे कीर्तीन झाल्यावर खुल्या अधिवेशनात विविध ठराव संमत झाल्यावर पुरस्कार वितरण सोहळा व सांगता समारंभ होईल. राज्य विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित राहतील. 

वारकरी साहित्य परिषदेतर्फे जाहीर झालेले वारकरी विठ्ठल पुरस्कार यावेळी दिले जातील. यात वारकरी संप्रदायासाठी राज्यात अमूल्य काम करणाऱ्या स्व. धोंडोपंतदादा शिरवळकर यांना पुरस्कार मरणोत्तर दिला जाईल. तर वारकरी संप्रदायाची विशेष सेवा केल्याबद्दल रामेश्वर महाराज शास्त्री यांना वारकरी विठ्ठल पुरस्कार तसेच कृष्णामहाराज लांबे यांना जीनवगौरव पुरस्कार दिला जाईल. माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, माजीमंत्री दिवाकर रावते हे देखील संमेलनास उपस्थित राहतील.

Warkari Sahitya Parishads Marathi Sant Sahitya Sammelan in Mumbai! The meeting will last for two days

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com