खडखड धरणातून पाण्याची गळती कायम; लाखो रुपये खर्चूनही भिंतीला झरे

खडखड धरणातून पाण्याची गळती कायम; लाखो रुपये खर्चूनही भिंतीला झरे

जव्हार: जव्हार तालुक्‍यातील खडखड धरणाची गळती थांबवण्यासाठी आतापर्यंत किमान तीन वेळा लाखो रुपये खर्च करून काम करण्यात आले; मात्र त्याचा काहीही फायदा झाला नसून अजूनही खडखड धरणाची गळती कायम आहे. धरणाच्या दोन्ही बाजूच्या भितींमधून पाण्याचे अनेक झरे वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडीदेखील होत आहे. 

15 वर्षांपूर्वी तब्बल 73 कोटी खर्च करून खडखड धरणाचे बांधकाम करण्यात आले; मात्र सुरुवातीपासूनच निकृष्ट कामामुळे हे धरण नेहमी वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. धरणाच्या भिंतींमधून गळती होत असल्याबद्दल अनेक वेळा सिंचन विभागाकडे तक्रारी केल्या; मात्र काहीही फायदा झाला नसल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले आहे. 
जव्हार नगर पालिकेसाठी येथून पाणीपुरवठा करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी जवळपास 36 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे जव्हारमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत झाली. तसेच जुनी जव्हार आणि कासटवाडी या दोन ग्रामपंचायतीमधील गावांसाठी या धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पाणी वाया जाऊ नये म्हणून तातडीने धरणाची गळती थांबवणे आवश्‍यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. याबाबत सिंचन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

गावांना धोका 
खडखड धरणाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने खडखड, धरमपूर व धरणाखालील काही गावांना धोका असल्याची भीती येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Water leakage from a khadkhad dam Millions of rupees were spent on the wall

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com