वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली हे तिन्ही पर्यटन व तिर्थक्षेत्राला भीषण पाणी टंचाई

Water Scarcity at Vajreshwari Ganeshpuri Akloli in Bhiwandi
Water Scarcity at Vajreshwari Ganeshpuri Akloli in Bhiwandi

वज्रेश्वरी : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा वज्रेश्वरी तिर्थक्षेत्र परिसरात येथील नदी आटल्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन ने भातसा तलावामधून पाणी सोडून निदान पिण्यापुरते तरी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील तहानलेले ग्रामस्थ करीत आहे.

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली, या तिर्थक्षेत्र पाण्यासाठी अकलोली येथे तानसा नदी किनारी वज्रेश्वरी पाणीपुरवठा योजना कार्यन्वित आहे. मात्र यावर्षीचे तापमान, पाणी दुष्काळ व त्यात पाण्याचा येथील रस्त्यांसाठी केलेला उपसा, यामुळे येथील तानसा नदी मे महिन्यात पूर्णतः आटली गेली. नदीमध्ये पाणीच नसल्याने येथील पाणी पुरवठा योजनेची जॅकवेल पूर्ण उघडे पडले आहे. त्यामुळे नदीमध्ये पाणीच नाही तर पुरवठा कसा होईल? परिणामी येथील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, या ठिकाणी तिन्ही गावच्या ग्रामपंचायत मिळून नवीन मोटार पंप, पाइप आणून नदीतील पाणी असलेल्या एका छोट्या डबक्यात मोटर पाईप टाकून त्यातील हे पाणी जॅकवेलपर्यंत पोहचवले जात आहे व येथून हे पाणी नागरिकला दिले जात आहे. मात्र हे पाणी पिणे योग्य नसल्याने काही नागरिक आजारी पडत आहे. सद्यस्थितीत हे पाणी देखील संपले असल्याने आज तब्बल दहा दिवस झाले आहे. हे तीर्थक्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. 

दरम्यान या भागात काही सामाजिक कार्यकर्ते मिळून पाणी टंचाई दूर करण्यासाठी नदीवर थांबून पाणी डबके शोधत असून प्रयन्त करीत आहे. या भागात पाण्याची भीषण टंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असून महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी येथील हॉटेल, व्यावसायिक, यांचे व्यवसाय बंद पडण्याचा मार्गवर आहेत. या ठिकाणी दोन दिवसात पाऊस न पडल्यास आणखी काही दिवस येथील तिन्ही गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

अशी होऊ शकते पाणी टंचाई दार...
या भागातील तानसा नदीला जोडून अनेक नाले आहेत. त्यामध्ये सैतानी नदी ही तानसा नदीस मिळते. येथील एखादया लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन जलसंपदा विभागाकडे भातसा धरणामधून येथील ग्रामस्थांसाठी पिण्याचे पाणी मागितलेस व ते पाणी काही प्रमाणात सोडले तर येथील सैतानी नदी मार्गातून थेट तानसा नदीमध्ये उतरून येथील पाणी पुरवठा योजनेचा जॅकवेल पाण्याखाली येऊन येथील पाणी टंचाई दूर होऊ शकते. यासाठी लोकप्रतिनिधी व शासन यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नाहीतर येत्या काही दिवसात या तीर्थक्षेत्रामध्ये पाण्यासाठी हाहाकार उडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com