Water Supply close in Kalyan and Titwala
डोंबिवली : कल्याण, टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी (ता. ११) १२ तास बंद राहणार आहे. मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रावर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे, असे कल्याण -डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.