रायगड: जलवाहतूक दहा टक्क्याने स्वस्त होणार; सरकारच्या निर्णयाचा प्रवाशांना फायदा

Water transport
Water transportgoogle

अलिबाग : जलवाहतुकीला (water transportation) प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने (Maharashtra Maritime Board) प्रवासी कर रद्द केला आहे. यामुळे प्रवासी जलवाहतूक १० टक्क्यांनी स्वस्त (cheap rate) होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा रायगड जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात (budget session) जलवाहतुकीचे दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार कमीत कमी १० रुपयांपासून १५० रुपये दर कमी होणार आहेत.

Water transport
मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसावर जीवघेणा हल्ला

जलवाहतूक स्वस्त व्हावी यासाठी राज्य सरकारने १० टक्के प्रवासी कर (लेव्ही) माफ करण्याचा निर्णय घेतला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना याचा कोणताही आर्थिक फटका बसणार नसून मेरिटाईम बोर्डाने उत्पन्नाच्या स्वरूपात येणारा प्रवासी कर रद्द केला आहे. मेरिटाईम बोर्डाच्या एकूण उत्पन्नातील १२ टक्के वाटा प्रवासी जलवाहतुकीचा आहे. हे उत्पन्न आता बंद होणार आहे. हा तोटा मेरिटाईम बोर्ड इतर मार्गाने भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

मुंबई-मांडवा हा जलवाहतुकीचा सर्वात व्यग्र मार्ग असून दिवसाला हजारो प्रवासी रो-रो, स्पीड बोटी, लॉंच यांच्याद्वारे प्रवास करतात. एका व्यक्तीसाठी २२० ते ३६० रुपयांपर्यंत तिकीट या मार्गासाठी दर आहे; तर स्पीड बोटीसाठी ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे. याचबरोबर आगरदांडा-दिघी, रेवस-करंजा या मार्गावरही जलवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
भविष्यात भाऊचा धक्का ते काशीद ही प्रवासी जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. या सर्वांना नव्या सवलतीचा फायदा होईल.

जलवाहतुकीद्वारे पर्यटनाला चालना मिळते; परंतु या प्रवासाचे सध्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील आहेत. मांडव्याला स्पीड बोटीने प्रवास करणारे धनिक, प्रसिद्ध व्यक्ती असे मोजकेच प्रवासी असतात; परंतु लॉंच आणि रो-रो’द्वारे प्रवास करणारे अधिक प्रवासी आहेत. या मध्यमवर्गीय प्रवाशांनाही या सवलतीचा फायदा मिळणार असल्याचा समाधान आहे. यामुळे अलिबागच्या पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल.
- निमीष परब, संचालक- आवास बीच कॉटेज.

प्रवासी जलवाहतुकीतील मेरिटाईम बोर्डाचा वाटा उत्पन्नात १२ टक्क्यापर्यंत आहे. जलवाहतुकीला प्रोत्साहन मिळण्यासाठी मिळणारी १० टक्के लेव्ही रद्द करण्याचा निर्णय उच्चस्तरावर झाला. हे उत्पन्न इतर मार्गाने भरून काढण्यात येणार आहे. राज्य सरकारचे पुढील आदेश आल्यावर नवे तिकीट दर लागू होतील.

- सुधीर देवरा, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com