esakal | तुम्ही शिका शुल्क आम्ही भरु; BMCचीअभिनव योजना
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्ही शिका शुल्क आम्ही भरु; BMCचीअभिनव योजना

: महानगर पालिकेच्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत पहिल्या पंचवीसात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च महापालिका करणार आहे.

तुम्ही शिका शुल्क आम्ही भरु; BMCचीअभिनव योजना

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : महानगर पालिकेच्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत पहिल्या पंचवीसात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च महापालिका करणार आहे.विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाचे संपुर्ण शुल्क अथवा किमान 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.तसा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीच्या पटलावर मांडला आहे.

देयके थकल्याने हाफकीनचा औषध पुरवठा बंद करणार; 'ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर' फाउंडेशनचा इशारा

मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतून दहावीला 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सध्या 10 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येते.तर,90 ते 94.99 पर्यंत टक्के असलेल्या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपयांचे बक्षिस देण्यता येते.त्याच बराेबर आता पालिकेच्या शाळेतून दहावीच्या परीक्षेत पहिल्या पंचविसात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्चही महानगर पालिका उचलणार आहे.वैद्यकिय अभियंात्रिकी,तांत्रिक पदवी पदवीका अभ्यास क्रम तसेच कला,वाणीज्य आणि विज्ञान विषयातील पदवी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च महानगर पालिका उचलणार आहे.या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी किमान 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती महानगर पालिका देणार आहे.ज्या अभ्यासक्रमाचे शुल्क 25 हजार रुपयां पेक्षा जास्त असेल त्या अभ्यासक्रमाचे संपुर्ण शुल्क भरण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे.
यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नांची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.या अनुदानासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असून निधी कमी पडणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येणार आहे.असेही प्रशासनाने या प्रस्तावात नमुद केले आहे.शिक्षण समितीची बैठक सोमवारी (ता.14) ला होणार आहे.

मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण द्यावे; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

महानगर पालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी हातावर पोट घेऊन जगणाऱ्या कुटूंबातील असतात.या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महानगर पालिकेने दादर,मुलूंड आणि विलेपार्ले येथे खासगी संस्थांच्या मदतीने कनिष्ट महाविद्यालय सुरु केले आहे.या महाविद्यालयांमध्ये पालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.

दहावी पर्यंतच्या शाळा वाढवणार
महानगर पालिकेच्या 49 शाळां या दहावी पर्यंतच्या आहेत.तर,आठवी पर्यंतच्या शिक्षण देणाऱ्या 914 शाळा आहे.आठवी पर्यंतचे शिक्षण झाल्यावर पुढे जवळ शाळा नसल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर येण्याचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळे आता पालिका दहावी पर्यंतच्या शाळांची संख्या वाढणार आहे.उपलब्ध सुविधां नुसार शाळा दहावी पर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे.अशी माहितीही शिक्षण समितीच्या पटलावर मांडण्यात आली आहे.

We pay the tuition fee BMCs innovative plan

===================================

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image