esakal | 'ईडीविरोधात आंदोलन करणार नाही, कायद्यानेच चोख उत्तर देऊ'; संजय राऊत यांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

'ईडीविरोधात आंदोलन करणार नाही, कायद्यानेच चोख उत्तर देऊ'; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शिवसैनिकांची अस्वस्थता मी समजू शकतो; मात्र अमंलबजावणी संचालनालयाविरोधात शिवसैनिकांच्यावतीने कोणताही मोर्चा अथवा आंदोलन केले जाणार नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

'ईडीविरोधात आंदोलन करणार नाही, कायद्यानेच चोख उत्तर देऊ'; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई, : शिवसैनिकांची अस्वस्थता मी समजू शकतो; मात्र अमंलबजावणी संचालनालयाविरोधात शिवसैनिकांच्यावतीने कोणताही मोर्चा अथवा आंदोलन केले जाणार नाही. याबाबत माध्यमात आलेले वृत चुकीचे आसल्याचे स्पष्टीकरण शिवसेना खासदार आणी प्रवक्ते संजय राऊत ट्‌विटरच्या माध्यमातूनन केले आहे. तसेच, बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ, कर नाही त्याला डर कशाला? असे राऊत यांनी म्हटले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे ्क्लिक करा

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते; मात्र या सर्व चर्चांवर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत राऊत यांनी म्हटले आहे की, "रस्त्यावर या कारणासाठी उतरणार नाही. जेव्हा उतरण्याची वेळ येईल तेव्हा अवश्‍य उतरू. शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही.' 

गेल्या काही दिवसांपासून ईडी कडून शिवसेना नेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ईडी कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून आंदोलन केले जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची चर्चा होती; मात्र या सर्व चर्चांना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत ब्रेक लावला आहे. 
We will not agitate against ED we will give a fair answer by law Reaction of Sanjay Raut

----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )