दोन-चार दिवसात रेल्वे, हॉटेलबाबत निर्णय घेऊ - मुख्यमंत्री

"बसमध्ये बेल वाजवत कंडक्टर आगे बढो सांगतो, तसा आगे बढो सांगणारा कोणी पंतप्रधान पाहिजे"
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal media
Updated on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचा (electric bus) लोकार्पण सोहळा आज माहिम बसस्थानकात पार पाडला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव यांनी दोन-चार दिवसांत रेल्वे, (railway) रेस्टोरंट (Restaurant) बाबत निर्णय घेऊ असे सांगितले. "लोकल सेवा बंद आहे. पण 'कामरे मे बंद है चावी खो गई है' अशी आपली अवस्था नाही. थोडं दमाने घ्या. कोरोना उलटणार तर नाही ना ही भीती आहे. पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली ती झपाट्याने. रेस्टोरंट सुरू करण्यासाठी ही प्रयत्न असेल" असे उद्धव यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. "बसमध्ये बेल वाजवत कंडक्टर आगे बढो सांगतो, तसा आगे बढो सांगणारा कोणी पंतप्रधान पाहिजे" असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
तेजसच्या रूपाने तिसऱ्या ठाकरेंचा राजकारणात प्रवेश होणार ?

"बेस्टचा प्रवास हा अभिमानास्पद आहे. 1874 ते 2021 पर्यंत बेस्ट मध्ये बदल होत गेला." ट्राम मधून माँ साहेब आम्हाला फिरायला न्यायच्या ती आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितली. "कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. त्यात हा इलेक्ट्रिक बस उपक्रम महत्वाचा आहे. बेस्ट, रेल्वेशी प्रत्येकाचा संबंध आला आहे. मी शाळेत बेस्ट बसनेच जात होतो" असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray
कस्तुरबा रुग्णालयात गॅसची गळती; अग्निशमन दल घटनास्थळी

"प्रवाशांसाठी ही बेस्ट सेवा सुरू आहे. कोरोना काळात सगळे ठप्प असतांना बेस्टने अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी सज्ज राहिली. जनतेची सेवा करत राहणे हा बेस्ट कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे" असे मुख्यमंत्री म्हणाले. 24 इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या असून 12 मीटर लांबीच्या बेस्ट बस मुबंईत धावणार आहेत. या कार्यक्रमला उद्धव ठाकरेंसह त्यांचे सुपूत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com