esakal | शाब्बास मुंबईकर !  मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर...
sakal

बोलून बातमी शोधा

शाब्बास मुंबईकर !  मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर...

मुंबईत 1010 नवीन रुग्णांची भर, तर 47 रुग्णांचा मृत्यू...

शाब्बास मुंबईकर !  मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर...

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबई कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. काल 719 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,03,468 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 85 दिवसांवर गेला आहे. तर 15 ऑगस्ट पर्यंत एकूण 6,51,593  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  9 ऑगस्ट  ते 15 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.82 इतका आहे. 

दरम्यान, मुंबईत काल बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा हजारच्या वर गेला असून काल  दिवसभरात 1,010 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,28,726 झाली आहे. मुंबईत काल 47 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,130 वर पोचला आहे. मुंबईत 719 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्के इतका आहे.    

मोठी बातमी - संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यारून वाद; आयएमएची दिलगीरी व्यक्त करण्याची मागणी

मुंबईत नोंद झालेल्या 47 मृत्यूंपैकी 35 जणांना दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 32 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 47 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते. 33 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.   

मुंबईत 570 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,631 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,482 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,709 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

well done mumbaikar recovery rate of mumbai covid 19 patients is above 18 percent