esakal | नाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

नाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार ?

"एकनाथ खडसे हे पक्षाला जन्माला घालणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांचा पक्षवाढीमध्ये मोलाचा आणि मोठा वाटा आहे"

नाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार ?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : भारतीय जनता पक्षाला मजबुतीने महाराष्ट्रात उभे करणारे, पक्ष बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे, भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते, जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर भारतीय जनता पक्षाला रामराम केलाय. पक्षात काम  करत असताना मला मुद्दामून त्रास देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी पक्ष सोडून जात आहे असं एकनाथ खडसे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या भाजप राजीनाम्यानंतर त्यांच्या मुक्ताईनगरमधील आणि राज्यातील अनेक समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. येत्या शुक्रवारी एकनाथ खडसे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. दरम्यान एकनाथ खडसे त्यांच्यासारखीच नाराजी भाजपच्या आणखी एका नेत्याने याआधी बोलून दाखवली होती. प्रकाश मेहता यांनी त्यांची नाराजी आधी व्यक्त केलेली. 

महत्त्वाची बातमी : NCP मधील एक मंत्री खडसेंसाठी पद सोडणार ? नाथाभाऊंना कोणतं पद किंवा खातं ? चर्चा तर होणारच !

त्यामुळे स्वाभाविकच एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या वाटेवर तुम्ही देखील जाणार का असा प्रश्न प्रकाश मेहता यांना विचारण्यात आला. यावर प्रकाश मेहता यांनी थेट उत्तर दिलं आहे. 

"एकनाथ खडसे हे पक्षाला जन्माला घालणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांचा पक्षवाढीमध्ये मोलाचा आणि मोठा वाटा आहे. त्यांना पक्षात सन्मान मिळतो. माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये. त्यांनी पक्ष सोडण्याचा पुनर्विचार करावा. मी एकनाथ खडसे यांच्यासारखा निर्णय घेणार नाही, मी अजिबात पक्ष सोडून जाणार नाही", असं देखील प्रकाश मेहता म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : सरपंचपद ते भाजपचा राजीनामा, जाणून घ्या एकनाथ खडसेंचा 40 वर्षाचा खडतर राजकीय प्रवास

एकनाथ खडसे म्हणजेच नाथाभाऊंनी भाजप सोडू नये अशी सर्वच भाजप नेत्यांची अपेक्षा होती. मात्र आज एकनाथ खडसे यांनी आपला राजीनामा दिल्याने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय    

well known bjp leader prakash mehata comments on the resignation of eknath khadse