esakal | जे.पी. नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राम कदमांकडून निषेध, घाटकोपरमध्ये मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

जे.पी. नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राम कदमांकडून निषेध, घाटकोपरमध्ये मोर्चा

या हल्ल्याचा निषेध करत घाटकोपर (प) विधानसभा भाजप आमदार राम कदम यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

जे.पी. नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राम कदमांकडून निषेध, घाटकोपरमध्ये मोर्चा

sakal_logo
By
निलेश मोरे

मुंबईः पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर 
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे दोन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर आहे. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जे पी नड्डा कोलकात्यात गेले होते. यावेळी पश्चिम बंगालमध्ये जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. 

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनीही या हल्ल्याचा निषेध करत घाटकोपर (प) विधानसभा भाजप आमदार राम कदम यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. जे पी नड्डा हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना त्याचवेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात काही भाजप नेते जखमी झाल्याचंही बोललं जात आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहन ताफ्यावर झालेला हल्ला हा टीमसीच्या गुंडांनी केलेलं अतिशय निंदनीय आणि लज्जास्पद आहे. भाजपतर्फे आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो, असं म्हणत आमदार राम कदम यांनी ममता दीदी हीच लोकशाही आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

महत्त्वाची बातमी-  मुंबईत खाद्यतेलाची भेसळ करणार्‍यांवर 15 दिवसांत तिसरी कारवाई

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

west bengal attack on jp nadda Ram kadam react protest ghatkopar

loading image