Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार, मुंबई लोकलवर १० तासांचा मेगाब्लॉक; कुठून-कुठे? जाणून घ्या...

Local Train Megablock: मुंबई लोकल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक लोकलसेवा रद्द करण्यात येणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : पश्चिम रेल्वेकडून शनिवारी-रविवारी मध्यरात्री उपनगरी मार्गावर १० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जोगेश्वरी-राम मंदिरदरम्यान मेट्रो-६ प्रकल्पासाठी स्टील गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. यासोबतच दहिसर येथे दोन पादचारी पुलांच्या गर्डर लाँचिंगचे कामही होणार असल्याने या कालावधीत एकूण ५५ लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत, तर काही मेल-एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com