
पश्चिम रेल्वेचा उपनगरीय रेल्वेमार्गावर एकीकडे प्रवाशांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे फुकट्या प्रवाशांमध्ये देखील मोठी भर पडतेच आहे.
Western Railway : फुकट्यांकडून पश्चिम रेल्वेने वसुल केले १५८ कोटी रुपये!
मुबई - पश्चिम रेल्वेचा उपनगरीय रेल्वेमार्गावर एकीकडे प्रवाशांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे फुकट्या प्रवाशांमध्ये देखील मोठी भर पडतेच आहे. अशा विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेतर्फे वारंवार कारवाई करण्यात येते. पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षभरात २७. ७० लाख फुकट्या प्रवाशांत कारवाई करत तब्बल १५८ कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आलेला आहे. याशिवाय केवळ दोन तिकीट तपासणीसांच्या विनातिकीट प्रवासी तपासणीतून २ कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय सेवा, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते. विनातिकीट प्रवास आणि इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या अशा महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एप्रिल २०२२ ते फेबुवारी २०२३ या कालावधीत विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २३.७० लाख प्रकरणे आढळून आली, या प्रकरणांमधून १५८.२८ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ६८ टक्क्यांनी वाढल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
२ कोटींची दंडात्मक वसुली
चर्चगेट आणि राजकोट येथील भरारी पथकात कार्यरत असणाऱ्या दोन तिकीट तपासणीसांनी गतवर्षी फुकट्या प्रवाशांना रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. केवळ दोन तिकीट तपासणीसांच्या विनातिकीट प्रवासी तपासणीतून २ कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. राजकोट विभागातील के.डी. ओझा आणि चर्चगेट येथील जाहिद कुरेशी या मुख्य तिकीट निरीक्षकांनी फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत २ कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
यामध्ये अहमदाबाद विभागातील तिकीट परीक्षक यांनी १७,८०६ प्रकरणांमधून ९३.४७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. तर अहमदाबाद विभागातील महिला तिकीट तपासणीस शैला तिवारी यांनी ७,२९३ प्रकरणे शोधून ५४.७० लाख दंड वसूल केला आहे. चर्चगेट येथील गीताबेन वसावा यांनी ७,०८५ प्रकरणांमधून ५१.१९ लाख दंड वसूल केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.