पश्चिम रेल्वे भंगार विक्रीत देशांत प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Western Railway First in sales of scrap india
पश्चिम रेल्वे भंगार विक्रीत देशांत प्रथम

पश्चिम रेल्वे भंगार विक्रीत देशांत प्रथम

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या सहा महिन्यात भंगार विक्रीतून १५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये चालू वर्षात सहा महिन्याचा कालावधीतील १५० कोटीं रुपये महसूल गोळा करणारा पहिला झोन पश्चिम रेल्वेला ठरला आहे.

पश्चिम रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने " शून्य भंगार मोहीम" सुरू केले आहे. या अंतर्गत पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व विभागातून चालू वर्षात एप्रिल ते जुलै २०२२ दरम्यान, भंगाराच्या विक्रीतून १५१.७५ कोटी रुपयांचा महसूलाची नोंदवली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील ८८.९१ कोटी रुपये इतकी होती. जी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८८ टक्यांने अधिक आहे. या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून १५० कोटी रुपयांचा मोठा टप्पा ओलांडणारा पहिला झोन बनण्याचा मान भारतीय रेल्वेत पश्चिम रेल्वेला मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळत नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. झिरो स्क्रॅप मिशनचा एक भाग म्हणून,पश्चिम रेल्वेच्या सर्व विभाग आणि विविध डेपोवर भंगारविक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेने ५१३.४६ कोटी रुपयांचे भंगार विकले आहे.

Web Title: Western Railway First In Sales Of Scrap India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top