Mumbai Local: चाकरमान्यांचे हाल! लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने

लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे
Local Train
Local TrainEsakal

सकाळी कामाच्यावेळी मुंबईकरांचे हाल होत आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामूळे पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत. ऐनवेळी रेल्वेचा खोळंबा आणि रिपरिप पावसामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.  (Marathi Tajya Batmya)

लोकलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.

आज सकाळी पावणे सातच्या सुमारास बोरिवली येथे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या 35 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. बोरिवली ते चर्चगेटकडे जाणाऱ्या या लोकलवर तांत्रिक बिघाडाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. (Marathi Tajya Batmya)

Local Train
N Chandrasekaran : टाटांच्या अध्यक्षांनी बनवला महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप, अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

जलद आणि धीमी या दोन्ही लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे लोकल उशिराने धावत असल्याची माहिती आहे. लोकल उशिराने धावल्याने प्रवाश्यांमध्ये नााराजी आहे. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ पॉईंट बिघाड झाला होता, त्यामुळे ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होती. सध्या ती दुरुस्त करण्यात आली आहे, असं पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितलं आहे.(Marathi Tajya Batmya)

Local Train
Weather Update : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

पश्चिम रेल्वेच्या गाड्या सुमारे 40 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. सकाळच्या वेळी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चाकरमान्यांना कामावर जायला उशिर झाला. लोकल लेट झाल्याने पश्चिम रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर तुफान गर्दी झाली होती. त्यातच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. (Marathi Tajya Batmya)

Local Train
Abdul Sattar: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल; निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं तपासात उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com