Western Railway : दिवाळीच्या तोंडावर पश्चिम रेल्वेचा निर्णय; प्लॅटफॉर्म तिकीट पाच पटीने वाढलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Western Railway
Western Railway : दिवाळीच्या तोंडावर पश्चिम रेल्वेचा निर्णय; प्लॅटफॉर्म तिकीट पाच पटीने वाढलं!

Western Railway : दिवाळीच्या तोंडावर पश्चिम रेल्वेचा निर्णय; प्लॅटफॉर्म तिकीट पाच पटीने वाढलं!

दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. अशातच चाकरमान्यांची आपापल्या गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसून येत आहे. यामध्येच पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात तब्बल पाच पटीने वाढ केली आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या काही रेल्वे स्टेशनवर आता प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आलं आहे. याआधी हे शुल्क १० रुपये होतं. मात्र आता हे पाचपट वाढवण्यात आलं आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल, दादर, बोरीवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उढना, सुरत या स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ झाली आहे.

मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपल्या गावी परतत असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. पुणे मुंबईकडून सातारा कोल्हापूर कडे जाणाऱ्या महामार्गांवरची वाहतूक खोळंबली आहे. तर दुसरीकडे पुणे मुंबईदरम्यानच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

टॅग्स :Western Railway