Mumbai Local News: फुकट्यांची नाकेबंदी; एका दिवसात ७४७ प्रवाशांवर कारवाई

Action against 747 passengers in one day: त्यामध्ये ७४७ विनातिकीट प्रवाशांना पकडत त्यांच्याकडून २ लाख २ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे
Railway News
Railway Newssakal

Railway News: पश्चिम रेल्वेने पुन्हा फुकट्या प्रवाशांची नाकेबंदी सुरू केली आहे. मंगळवारी मालाड रेल्वे स्थानकावर २८ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ७४७ फुटक्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. ज्याद्वारे तब्बल दोन लाख २ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

Railway News
Railway News: ‘वंदे भारत ट्रेन' होणार आणखी फास्ट; प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय!

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलने दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे लोकल गाड्यांसह रेल्वे स्थानकात मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेकजण विना तिकीट प्रवास करत असल्याने रेल्वेचा महसूल बुडतो.

त्यापार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने मंगळवारी मालाड स्थानकात २८ तिकीट तपासणीस आणि २ आरपीएफ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ५ जवानांच्या सहकार्याने दिवसभर धडक मोहिम राबवली.

त्यामध्ये ७४७ विनातिकीट प्रवाशांना पकडत त्यांच्याकडून २ लाख २ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

Railway News
Railway News: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करा; केंद्रीय मंत्र्यांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com