esakal | मुंबईतील 'रेल्वे सेवा' कधी सुरु होणार? आता मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील 'रेल्वे सेवा' कधी सुरु होणार? आता मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर...

वडापाव मिळायला हवा. वडापावसोबत आणखी बऱ्याच गोष्टीही मिळायला हव्यात. त्यादृष्टीने तयारी आणि वाटचालही सुरु आहेत. त्यामुळे मुंबईत लवकरच वडापावही मिळेल. 

मुंबईतील 'रेल्वे सेवा' कधी सुरु होणार? आता मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर...

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी प्रकट मुलाखत घेतली. कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत अत्यंत महत्त्वाची मनाली जातेय. या मुलाखतीला अनलॉक मुलाखत बोललं जातंय. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी साधलेला संवाद ते विरोधकांचे आरोप प्रत्यारोप यावर भाष्य केलंय. या मुलाखतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठरे यांनी मुंबईकरांसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, म्हणजे मुंबई लाईफलाईनवरही भाष्य केलंय  

मुंबईची लोकल सेवा सुरू होणार का?
   
संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व मुंबईकरांच्या मनातील प्रश्न विचारला. मुंबईतील लोकलसेवा अजूनही सुरू होत नाही त्यामुळे मुंबईतील लोकांनी प्रवास कसा करायचा?

हेही वाचा : तुमच्या ताटातील मटण फ्रेश आहे ना ? कारण, देवनार कत्तलखान्यात तर आहे शुकशुकाट आणि...

'यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे म्हणालेत की, ही तारेवरची कसरत आहेत. एकदा काय ते ठरवावं लागेल. एकतर इस पार या उस पार. जर दोन्ही सांभाळायचं असेल तर रेल्वे रुळावरून चालली पाहिजे. रेल्वे सुरू करूया, वडापाव सुरू करूया, पण एकदा काय ते एक टोक स्वीकारा. घाईगडबडीने, घिसाडघाईने तुम्हाला निर्णय घ्यायचाय का?  असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. कोरोनाच्या काळात कुटुंबंच्या कुटुंबं आजारी पडत आहेत, मृत्युमुखी पडत आहेत. मग कुटुंबं मृत्युमुखी पडल्यावर घराला जे टाळं लागेल, त्या लॉकडाऊनला कोण उघडणार? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. कुटुंबच्या कुटुंब जर गेलं तर त्या घराचं टाळं कोण उघडणार? म्हणून ते टाळं नको असेल तर या गोष्टी टाळा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत 

हेही वाचा : शेकडो मुंबईकरांना कोरोनामुक्त करण्यासाठी धारावीकर आले पुढे...

मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार?

मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार? कारण जोपर्यंत वडापाव मिळत नाही तोपर्यंत मुंबई सुरळीत झाली असे या देशात कुणी मानणार  नाही असा सवालही संजय राऊतांनी केला, यावर मुख्यमंत्री म्हणालेत की..  

वडापाव मिळायला हवा. वडापावसोबत आणखी बऱ्याच गोष्टीही मिळायला हव्यात. त्यादृष्टीने तयारी आणि वाटचालही सुरु आहेत. त्यामुळे मुंबईत लवकरच वडापावही मिळेल. 

what cm uddhav thackeray says about mumbai local when will train start