कल्याण ग्रामीण विधानसभा (Kalyan Rural Assembly) क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबईत प्रवेश करण्यात आला असल्याचा शासनाचा जीआर निघाला आहे.
डोंबिवली : नवी मुंबईतील 14 गावांत काय राजकारण शिजतंय हे आम्हाला देखील न उलगडलेले कोड आहे. परंतु, विकास निधी अभावी गावांचा प्रवेश अडकल्याची चर्चा सुरू आहे. पालिकेला उत्पन्न मिळवून देणारी ही गावे असून येथे अनेक लोकोपयोगी कामे होऊ शकतात. गावांच्या विकास निधी उपलब्धतेसाठी आम्ही पाठपुरावा करू. लवकरच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांसह मंत्री गणेश नाईक यांना भेटणार असल्याची माहिती मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी दिली.