हजाराची नोट येणार, दोन हजारांची जाणार ?

हजाराची नोट येणार, दोन हजारांची जाणार ?

चलनात लवकरच एक हजाराची नोट येणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. शिवाय 2000 हजाराची नोट बंद होणार असल्याचा दावाही मेसेजमध्ये करण्यात आलाय. आम्ही या व्हायरल मेसेजमागचं सत्य शोधून काढलंय. काय आहे सत्य?  

  • चलनात येणार 1 हजाराच्या नव्या नोटा ? 
  • 2 हजाराची नोट हद्दपार होणार ?
  • काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य ? 

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नोटबंदी केली. त्याचे पडसाद सार्वजनिक जिवनात अजूनही उमटतायत. अशातच एक मेसेज व्हायरल होतोय. त्यात एक हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. इतकच नाही तर दोन हजारांची नोट बंद झालीय. असंही या मेसेजमध्ये म्हंटलंय. या मेसेजमुळे अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकलीय. 


या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय बघा ..

रिझर्व बँक ऑफ इंडिया 1 जानेवारी 2020 पासून एक हजारच्या नव्या नोटा बाजारात आणणार आहे. तर 2000 रुपयांच्या सर्व नोटा परत घेतल्या जाणार आहेत. तुम्हाला केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच्या नोटाच बदलता येऊ शकतात. नोटा लवकरात लवकर बदला. 
 

या मेसेजमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाही उल्लेख आहे. त्यामुळे अनेकांची चिंता वाढलीय. हा मेसेज खरा आहे का? सरकार खरंच पुन्हा एकदा नोटबंदी करणार का?  यामागचं सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं या व्हायरल मेसेजची पडताळणी केली. आमचे प्रतिनिधी बँक अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांच्याकडून सत्य जाणून घेतलं. 

चलनात असलेल्या दोन हजारच्या नोटा बंद झालेल्या नाहीत. तुर्तास दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद असली तरी या नोटा बंद करण्याचा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. याशिवाय 1000 रूपयांची नवी नोट येणार असल्याचा दावा देखील खोटा आहे. 

त्यामुळे तुम्ही अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. चलनातून दोन हजारांची नोट बंद होणार नाही तसच हजाराची नवी नोट आणण्याचं आरबीआयचं कोणतंही प्रयोजन नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा असत्य ठरलाय. 

WebTitle : what is reality of viral message related to one thousand rupees note

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com