
पनवेल : रासायनिक उद्योगांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे, तसेच विकासकामांमुळे तालुक्यात असलेल्या गाढी व कासाडी या प्रमुख नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. वारंवार आवाज उठवूनही शहरातील नद्यांना प्रदूषणाने घेरले आहे. त्यामुळे जलप्रदूषणाचे संकट दिवसेंदिवस बिकट होत आहे.
हे पण वाचा : या जिल्ह्यात माशीमार पक्षी चोहीकडे
पावसाळी नद्या म्हणून नोंद असलेल्या नवरानवरीच्या डोंगरात उगम पावणारी कासाडी नदी आणि माथेरानच्या डोंगरातून उगम पावणारी गाढी नदी या तालुक्यातील दोन्ही नद्यांना सध्या मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने वेढले आहे. उगमस्थानापासून तळोजा औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करेपर्यंत स्वच्छ आणि नितळ पाण्याने वाहणाऱ्या कासाडी नदीने औद्योगिक परिसरात प्रवेश करताच औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे पडघे गावापासून कोपरा खाडीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंतचे नदीचे पात्र पूर्णपणे प्रदूषित झाले आहे.
हे पण वाचा : विहिरींना हवी सुरक्षा! नक्की का हवी?
नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांना थेट हरित लवादाचे दरवाजे ठोठवावे लागले. म्हात्रे यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येत असल्याचे पाहायला मिळत असले तरी प्रदूषणाविरोधात हवा तेवढा लोकसहभाग मिळत नसल्याने कासाडीमधील प्रदूषण पूर्णपणे कमी होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.
सर्वाधिक प्रदूषित होणारे भाग
- पनवेलपासून ८ किलोमीटर भाग
- चिपळे पूल, देवद गाव, सुकापूर, विचुंबे परिसर
प्रदूषणााची कारणे
- परिसरातील निर्माल्य, घनकचरा, सांडपाणी
- चिपळे पुलापासून सुरू होणाऱ्या प्रदूषणात मांस विक्रेत्यांकडून टाकण्यात येणारा कचरा
- आश्रमातून टाकण्यात येणारी विष्ठा
८ किलोमीटरचे नदी पात्र दूषित
पनवेलकरांची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गाढी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पनवेलमधील निसर्ग मित्र संस्था मागील काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. संस्थेच्या सदस्यांकडून २३ किलोमीटरच्या नदी पात्रात वारंवार स्वछता मोहीम राबवली जाते; मात्र तरीही नदीचा ८ किलोमीटरच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केले जावेत, या हेतूने हरित लावादात दाखल केलेल्या याचिकेमुळे काही प्रमाणात सुधारणा होत असली तरी पूर्णपणे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलणे आवश्यक झाले आहे.
- अरविंद म्हात्रे. नगरसेवक, याचिकाकर्ता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.