आतली खबर : बैठकीनंतर 'हे' आहे शिवसेना आमदारांच्या मनात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

"साहेब आता तडजोड करू नका,मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा" अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या आमदारांची असून आपली भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली

मुंबई :  "साहेब आता तडजोड करू नका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा" अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या आमदारांची असून आपली भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली.उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती या बैठकीत आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पुढील भूमिका ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज आपल्या आमदारांची बैठक बोलावली.या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं.यावेळी आमदारांनी "साहेब आता तडजोड करू नका,मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा" अस सांगितलं.भाजप ने शिवसेनेला खूप त्रास दिला.दुय्यम दर्जाची मंत्रीपद शिवसेनेच्या गळ्यात मारली.गेली पाच वर्षे निधीसाठी रखडवलं, आता भाजपला धडा शिकवण्याची हीच ती वेळ अस आमदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.

"एका आमदारामागे एक शाखा प्रमुख" ; सेनेच्या आमदारांवर करडी नजर

भारत करणार 'या' सर्वात शक्तिशाली न्यूक्लियर मिसाईलची चाचणी

आम्हा सर्व आमदारांचा एकच सूर आहे,मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे.भाजपने मान्य न केल्यास 5 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असून उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल अशी प्रतिक्रिया आमदार सुनील प्रभू यांनी दिली.

शिवसेनेत  सगळे वाघाचे बछडे :

शिवसेना का घाबरेल शिवसेनेत तर सगळे वाघाचे बछडे आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली. आज मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला बच्चू कडू हे देखील उपस्थित राहिले.

Webtitle : what shivsena MLAs think after meeting after uddhav thackeray at matoshree

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what shivsena MLAs think after meeting with uddhav thackeray at matoshree