'राहुल गांधी पंतप्रधान होतील' ते 'जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट'; दीपिकाबाबत नेटकरी काय सांगू पाहतायेत

तुषार सोनवणे
Tuesday, 29 September 2020

कॉंग्रसेनेते राहुल गांधी एक दिवस पंतप्रधान होतील, अशी मला आशा आहे. असं दीपिकाने साधारण दहा वर्षापूर्वी म्हटलं होतं.

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि याप्रकरणात रिया चक्रवती सह ब़ॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स पाठवले. यात सर्वात मोठे नाव होते ते म्हणजे दीपिका पादुकोण! 

कॉंग्रसेनेते राहुल गांधी एक दिवस पंतप्रधान होतील, अशी मला आशा आहे. असं दीपिकाने साधारण दहा वर्षापूर्वी म्हटलं होतं. त्यावेळी देशात कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. आज भारतीय जनता पक्षाचे मजबूत सरकार केंद्रात आहे. तर राहूल गांधी विरोधी पक्षात आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला टक्कर देणारा एकही नेता सध्या देशात नसल्याच्या चर्चा राजकारणात होतात. परंतु राहुल गांधी मोदी यांच्या धोरणांचे कट्टर विरोधक आहेत. दीपिकाला एनसीबीने समन्स पाठवल्यानंतर दीपिकाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ दहा वर्षापूर्वीचा आहे. त्यात तीने राहुल गांधींची तरुणांमधील लोकप्रियता पाहता ते एक दिवस नक्की पंतप्रधान होतील असे म्हटले होते. 

एनसीबीने दीपिकाची पाच तास चौकशी केली. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना तिला तीन वेळा रडू कोसळले.  काही प्रश्नांना तिने उत्तरे दिली नसल्याचे कळते. संबधित व्हाट्सअप चॅट तिचेच असले तरी, तिने कधीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे म्हटले आहे. दीपिकासह सारा अली खान, श्रद्धा कपूरलाही एनसीबीने प्रश्न विचारले. पण तिघींनीही आपण ड्रग्ज घेतले नसल्याचे सांगितले. 

यासर्व प्रकरणात दीपिकाबाबत समाजमाध्यमांमध्ये मोठी चर्चा होत आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं म्हणणारी दीपिका गेल्यावर्षी जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही सहभागी झाली होती. खरंतर या दोन्ही बाबींचा तिच्या चौकशीशी संबध नाही. परंतु समाजमाध्यमांवर ह्या विषयांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करून दीपिकाच्या चौकशीबाबत नेटकऱ्यांना  नक्की काय म्हणायचेय याचा अर्थ ज्याने त्याने काढावा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When Deepika Padukone had said that Rahul Gandhi would be the Prime Minister