
विरार : एका बाजूला शासना तर्फे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवाची तयारी सुरु असतानाच वसई मध्ये मात्र एका पित्याने आपल्या पाल्याला काल रोल्स राईझ गाडीतून शाळेत नेल्याच्या घटनेची चर्चा वसई विरार मध्ये आज दिवसभर चर्चिली जात आहे. आपल्या खुप वर्षांनंतर झालेल्या नवसाच्या मुलाचा शाळेतील पहिला दिवस कायमचा यादगार राहावा म्हणून वसईतील एका बापाने चक्क त्याला शाळेत सोडण्यासाठी महागडी रोल्स राईझ गाडी सजवून वाजत गाजत मुलाला शैलीत सोडले . पेशाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या या बापाचं नाव नवीत भोईर असून मुलाचे नाव रेयांश आहे.