मास्टर ब्लास्टर सचिन जेव्हा मुंबईतला रस्ता विसरतो, तेव्हा रिक्षाचालक म्हणतो मला फॉलो करा

पूजा विचारे
Thursday, 26 November 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मुंबईच्या गर्दीत सचिन तेंडुलकर रस्ता चुकल्याचं दिसतंय. सचिन यांनी आपल्या आलिशान कारमधून हा व्हिडिओ शूट केला आहे. 

मुंबईः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मुंबईच्या गर्दीत सचिन तेंडुलकर रस्ता चुकल्याचं दिसतंय. सचिन यांनी आपल्या आलिशान कारमधून हा व्हिडिओ शूट केला आहे. 

सचिन तेंडुलकर कांदिवली पूर्व येथून आपल्या घरी बांद्राला जात होता. त्याच दरम्यान मास्टर ब्लास्टर रस्ता चुकला. सध्या उपनगरात अनेक मेट्रोची कामं सुरु असल्यानं काही मार्ग वन- वे केलेत. यामुळेच सचिन तेंडुलकरला रस्ता सापडत नव्हता. त्याच दरम्यान एका रिक्षा चालकानं त्याला ओळखलं आहे आणि त्यानं सचिनला हायवे पर्यंतचा रस्ता दाखवला. मुंबईच्या रिक्षाचालकाला जेव्हा सचिननं रस्ता विचारला तेव्हा मराठीतून रिक्षा चालक त्याला म्हणाला की, मला फॉलो करा. 

 

मंगेश फडतरे असं या रिक्षाचालकाचं नावं असून त्याने सचिनला आपल्या रिक्षाला फॉलो करण्यास सांगितलं. त्यानंतर रिक्षा चालकाला फॉलो करत सचिन हायवे वर पोहोचला. पुढे हायवे वर पोहोचल्यावर सचिननं कार बाजूला लावली. त्या रिक्षाचालकाची चौकशी करत त्याच्यासोबत सेल्फीही काढला.

अधिक वाचा-  मुंबईतील वोक्हार्ट रूग्णालयाला यूएसए JCI द्वारे सलग दुसऱ्यांदा मान्यता

रस्ता चुकल्याचं हा व्हिडिओ सचिननं आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे. त्यात मास्टर ब्लास्टरनं हा व्हिडिओ किस्सी जानेवारी २०२० असं म्हटलं आहे.

When master blaster Sachin forgets road Mumbai the rickshaw says follow me


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When master blaster Sachin forgets road Mumbai the rickshaw says follow me