मुरबाड रेल्वेची प्रतिक्षा संपणार कधी?

नंदकिशोर मलबारी 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

कल्याण - भिंवडी मेट्रोचे भूमिपूजन थाटामाटात देशाचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र टीटवाळा मुरबाड रेल्वेची प्रतिक्षा संपलेली दिसून येत नाही. आता तर नेतेमंडळींनी दिलेल्या आश्वासनाचे पाचवे वर्ष ही संपत आले आहे. मुरबाडकरांचे स्वप्न हे स्वप्नच राहाण्याची भिती निर्माण झाली आहे. 

कल्याण - भिंवडी मेट्रोचे भूमिपूजन थाटामाटात देशाचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र टीटवाळा मुरबाड रेल्वेची प्रतिक्षा संपलेली दिसून येत नाही. आता तर नेतेमंडळींनी दिलेल्या आश्वासनाचे पाचवे वर्ष ही संपत आले आहे. मुरबाडकरांचे स्वप्न हे स्वप्नच राहाण्याची भिती निर्माण झाली आहे. 

मुंबई पासुन 90 किमी अंतरावर असणाऱ्या मुरबाड रेल्वेसाठी आजुनही मुरबाड करांना प्रतिक्षा आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण मेट्रोचे भुमिपुजन करण्यात आले. व याचे बँनर मुरबाड मध्ये ही झळकले. या बँनर बाजी नंतर कल्याण येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार कपिल पाटील हे पंतप्रधान मोदींच्या अगदी जवळ असल्याने ते मोदींच्या कानात हा विषय सांगतील व मोदी आपल्या तोंडून मुरबाड रेल्वेचा उल्लेख करतील असी अशा मुरबाडकरांना होती. पण कुठेही मोदींच्या भाषणात मुरबाडच्या रेल्वेचा उल्लेख न झाल्याने मुरबाड करांनी नाराजीचा सूर काढत आपली नाराजी याच ठिकाणी व्यक्त केली. मुरबाडमध्ये कल्याण मुरबाड महामार्गा वर रेल्वे धावणार असे चार वर्षा पुर्वी टिटवाळा -मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या सर्वेचे बँनर झळकले मात्र आज पर्यत हा प्रस्थावित मार्ग प्रतिक्षेतच आहे.

नुकताच खासदार कपिल पाटील यानी मुरबाड मधिल एका कार्यक्रमात रेल्वे चा सर्वेक्षण रिपोर्ट फिजीबल  असल्याची माहीती दिली व येत्या मिनी अर्थिक बजेट मध्ये यासाठी अर्थिक तरतुद होईल असे आश्वासन दिले आहे. तर कॉग्रेस चे ठाणे जिल्हा सरचिटणीस व राजीव गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष चेतन पवार यानी मुरबाड तालुक्यातील सर्व गावागावात  कल्याण -मुरबाड -माळशेज रेल्वे साठी संघर्ष अभियान राबवत जन आंदोलनाची तयारी केली आहे.  याचाच अर्थ  मुरबाड रेल्वे हा  यंदाच्या निवडुकीचा विषय ठरणार असे चित्र दिसू लागले आहे.

मुरबाड शहर सर्व मुख्य शहरांना जोडला जावा म्हणून शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करून आमदार किसन कथोरे यानी मुरबाड तालुका महामार्गाचे जाळे होण्यासाठी चार महामार्ग मुरबाड शहराला जोडतील असे महामार्ग शासन दरबारी मंजूर करून घेतले आहेत. या महामार्गामुळे मुरबाड शहरातून  कोणत्याही शहराला जाता येणार असल्याने उद्दोगधंद्दे वाढणार असल्याने काही वर्षात व्यापार वाढणार असल्याने नोकरी पासून वंचित असलेल्या तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. ही बाब जमेची धरली तरी मुरबाडकरांचे स्वप्न आहेत ते मुरबाड रेल्वेचे रेल्वे मुळे अनेक प्रश्न सुटणार असल्याने 1950 मध्ये पहिला सर्वे, 1973,2003 नतंर 2010 साली प्रस्थावित 250 किमी रेल्वे साठी 772 कोटी मंजुर झाले असी चर्चा होती. मात्र ती चर्चाच राहिली.  तर 2015 मध्ये पुन्हा टिटवाळा -मुरबाड रेल्वेचे सर्वेक्षण लवकरच होणार असे आश्वासन मुरबाड लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी दिल्याने पुन्हा एकदा  आशावादी प्रवास सुरु झाला. पण खासदारकीचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपला अगदी काही महिनेच राहिलेले असतानाच कल्याण मेट्रो चे भुमिपुजनचे फलक झळकू लागल्याने मुरबाडकरांच्या  जखमेवर मीठ चोळल्याच्या प्रतिक्रिया नागरिकातुन येऊ लागल्या आहेत. 2019 निवडणूका जवळ आल्याने पुन्हा एकदा भाजपाच्या वतिने खासदारकिची माळ कपील पाटील यांच्याच गळ्यात पडणार असे त्यांचे निकटचे कार्यकर्ते खात्रीने सांगत असल्याने व हे सत्य ठरले तर मुरबाड रेल्वे पुन्हा निवडणुक मुद्दा बनु शकतो. आगामी निवडणूकीत कपील पाटील हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आणून मुरबाडकरांना रेल्वेचे स्वप्न दाखविली पण मुरबाडकर या वर किती विश्वास ठेवतिल हे आगामी निवडणूकात दिसून येईल. तर आता पर्यतच्या सरकारने दिलेले आश्वासन याला जनता कसा प्रतिसाद देते यावर येणाऱ्या निवडणुकीत चुरस दिसणार आहे. खासदारांसाठी कल्याण मेट्रो भिवंडीपर्यत येणार असी जोरदार चर्चा होत होती. मग कपील पाटलांसाठी  टीटवाळ्याची रेल्वे मुरबाड पर्यंत जाण्या साठी कोणती अडचण आली याचे उत्तर खासदार कपिल पाटील यांना आगामी निवडणूकीत मुरबाड करांना द्यावे लागेल हे सत्य आहे. 

मुरबाड शहरातील व्यापार वाढण्यासाठी मुंबई हे शहर रेल्वेने जोडणे गरजेचे आहे. मुरबाड तालुक्यात तयार होणारा भाजीपाला, औद्योगिक क्षेत्रात तयार होणारा माल मुंबई कडे पाठविणे जिकिरीचे होत असल्याने मोठे व्यापारी या ठिकाणी येत नाहीत. जर रेल्वे झाली तर मुंबई मुरबाड शहरासी जोडली जाईल या मुळे व्यापार वाढीला चालना मिळेल या साठी टिटवाळा- मुरबाड रेल्वे होणे गरजेचे आह
- एक व्यापारी, मुरबाड. 

आता आश्वासन नको आहे. आता कृती पाहीजे. मुरबाडकर आता आश्वासनाला बळी पडणार नाहीत. आता निवडणूका जवळ आल्या आहेत.हा मुद्दा निवडणूकीचा मुख्य विषय असणार आहे.
- एक राजकिय कार्यकर्ता. मुरबाड

Web Title: when Murbad's wait for the train will end ?