Holi festival : कोकणासाठी होळी विशेष रेल्वे गाड्या केव्हा सोडणार !

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष ?
When will Holi festival Special Trains for kokan mumbai
When will Holi festival Special Trains for kokan mumbaisakal

मुंबई : दरवर्षी होळी निमित्य कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. परंतु,अवघ्या काही दिवसांवर होळी येऊन ठेपली असताना रेल्वेने चाकरमान्यांसाठी अद्यापही होळी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली नाही.

परंतु होळीसाठी इतर राज्यात विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली जात आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांमध्ये रेल्वेचा कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. कोकणात गणेशोत्सवाबरोबरच होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात हा सण सुमारे १५ दिवस साजरा केला जातो. यंदा २५ फेब्रुवारी पासून शिमग्याला सुरुवात होत आहे. दरवर्षी होळी सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळ आणि रेल्वेकडून विशेष गाड्या चालविण्यात येतात. यंदा एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्यासाठी २५० विशेष चालविण्याची घोषणा केली आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाने अद्यापही विशेष गाड्यासंदर्भात घोषणा केली नाही.

दोन दिवसांपूर्वीच मध्य आणि पश्चिम रेल्वेने दादर - गोरखपूर, दादर - बलिया, नागपूर - मडगाव, सीएसएमटी - जयनगर अशा रेल्वे सेवा होळीसाठी घोषित केल्या असून २२ फेब्रुवारीपासून या गाड्यांचे आरक्षण देखील सुरू झाले आहे. परंतु महाराष्ट्रातील कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांची अद्याप घोषणा न झाल्याने चाकरमानी चिंतेत सापडले आहेत.

काय म्हणते रेल्वे ?

कोकणाकडे जाणाऱ्या होळी विशेष गाड्या लवकरच सोडण्यात येणार आहे. यामध्ये पनवेल - करमाळी, पुणे - करमाळी, एल टी टी - मडगाव या गाड्यांसहीत इतर गाड्यांचा समावेश असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. तर कोकण रेल्वेने कोकणाकडे जाण्यासाठी मागणीनुसार रेल्वे सेवा देण्यात येत असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.

गेल्यावर्षीही होळीला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक असताना विशेष एक्सप्रेसची घोषणा झाली. त्यामुळे ऐनवेळी रेल्वेत आरक्षण करण्यास घाई झाली. रेल्वेने कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे रेल्वेने तात्काळ कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडाव्यात-

अभिजित पाटील- प्रवासी

कोकणावासियांसाठी होळीनिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन एक महिन्यापूर्वी करायला पाहिजे होते, परंतु रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे चाकरमान्यांना पुढील नियोजन करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. अवघे १० दिवस शिल्लक असूनही अद्याप गाड्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कोकणवासीयांना रेल्वेच्या प्रवासापासून वंचित ठेवले जात आहे.

- राजू कांबळे, प्रमुख, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com